97632 06212 pwatsaru@yahoo.com

आंबेडकर आणि लोहिया : जातीविषयक एक संवाद


हा लेख एका अशा संवादाबद्दलचा आहे जो प्रत्यक्षात घडलेलाच नाही. खरे तर भीमराव आंबेडकर आणि राममनोहर लोहिया हे दोघेजण 1930 ते 1950 च्या दरम्यानच्या जवळपास 20 वर्षांच्या राजकारणात समकालीन होते. आंबेडकर हे लोहियांपेक्षा जवळपास 20 वर्षांनी मोठे होते. लोहियांचा परिचय असणे हे त्यांच्यासाठी आवश्यक नव्हते. याचे एक साधे कारण म्हणजे 1950 पूर्वी लोहिया हे मोठे लोकनेते म्हणून पुढे आलेलेच नव्हते. त्याचप्रमाणे या काळात लोहियांनी जातीवर फार काही उल्लेखनीय असे लिहिलेलेही दिसत नाही. पण म्हणून लोहिया आंबेडकरांना त्यांच्या लिखाणातून, राजकारणातून ओळखत नव्हते, असे असणे चुकीचे ठरेल. काँग्रेस समाजवादी पक्षाचे मुखपत्र असलेल्या काँग्रेस सोशालिस्टने आंबेडकरांची दखल 1930 च्या दशकातच घेतली होती. तसंही आम जनतेमधून उमटणार्या विचारांवर सुरुवातीपासून लक्ष असणार्या लोहियांच्या नजरेतून आंबेडकरांचे महत्त्व सुटणे ही बाब अशक्यप्राय होती आणि तरीही 1955 च्या पूर्वी लोहियांनी आंबेडकरांना भेटण्याचा विशेष प्रयत्न कधी केलेला दिसत नाही.

Subscribe Now !

Get instant access to the complete Watsaru archives

New 3-Month Subscription to Digital Archives at just Rs 350 for India and $15 for overseas users.

Subscribe