97632 06212 pwatsaru@yahoo.com

कुलगुरूंना हटवा


चंद्रशेखर रावसाो, आज दिवसभर मी तुम्हाला फोनद्वारे अनेकदा संपर्क करू पहिला पण तो होऊ शकला नाही. तुमच्या कर्मचार्यांकडे अनेक निरोपही धाडले, पण काहीही प्रतिसाद नाही. अखेर मी हे पत्र लिहायला घेतले आहे. अतिशय खेदाने आणि संतापाच्या भावनेने मी हे पत्र लिहीत आहे. शहीद भगतसिंग यांच्या स्मृतिदिनी हे पत्र लिहावे लागते आहे ही तर आणखीच वेदनादायक बाब आहे. काल हैदराबाद केंद्रीय विद्यापीठातील विद्यार्थ्यांवर आणि काही प्राध्यापकांवर ज्या निर्घृणपणे तेलंगणा पोलिसांनी हल्ला केला आणि तो कमी होता की काय म्हणून आज पुन्हा त्यांनी तितकीच बेदम मारहाण केली. विद्यापीठाच्या आवारात झालेल्या या घटना भयावह म्हणता येतील. विद्यार्थिनींवर हल्ला चढवताना पोलिसांनी जी अश्लाघ्य भाषा वापरली ती अत्यंत निषेधार्ह आहे.

Subscribe Now !

Get instant access to the complete Watsaru archives

New 3-Month Subscription to Digital Archives at just Rs 350 for India and $15 for overseas users.

Subscribe