97632 06212 pwatsaru@yahoo.com

पाखंडी अर्थात धर्मसुधारक


अयान हिरसी अली ह्या सोमालियात जन्मलेल्या एक मुस्लीम महिला आहेत. लहानपण कट्टर धार्मिक वातावरणात गेलेल्या अली यांनी - लहान वयात कुटुंबाने ठरवलेल्या पण स्वत:ला न पटलेल्या- विवाहबंधनात न अडकता घर आणि देश सोडला. 1990 मध्ये नेदरलँडमध्ये विस्थापित म्हणून आश्रय मिळाल्यापासून पाश्चात्त्य राहणी आणि विचारसरणीच्या प्रभावामुळे मुस्लीम संस्कार, परंपरा आणि रिवाज यांचे ओझे त्यांनी झुगारून दिले. कारखान्यात सफाईचे काम करण्यापासून सुरूवात करत डच संसदेचे सभासदत्व असा झालेला त्यांचा हा जीवनप्रवास कोणालाही मनोवेधक वाटेल. सध्या त्या हार्वड विद्यापीठात फेलो आहेत. या परिवर्तनाची कहाणी त्यांनी आपल्या खपषळवशश्र, छेारव आणि ढहश उरसशव तळीसळप या पुस्तकांतून यापूर्वी वाचकांसमोर मांडली आहे. यातील पहिल्या पुस्तकाच्या विक्रमी खपावरून त्यांचे विवेचन अनेकांपर्यंत पोचले आहे असे मानता येते. अय्यान यांनी आपल्या या नवीन पुस्तकाद्वारे मुस्लीम धर्मसुधारणांचा मुद्दा चर्चिला आहे. आपल्या या पुस्तकातील विवेचन फक्त धार्मिक कट्टरपंथीयांनाच नव्हे तर सामान्य श्रद्धाळू मुस्लीमांनाही धक्कादायक आणि धर्मविरोधी वाटेल यांची खात्री असल्यानेच कदाचित त्यांनी या पुस्तकाचे शीर्षक कशीशींळल असे योजिले असावे.