97632 06212 pwatsaru@yahoo.com

जनतेचे सांस्कृतिक सेनापती : राहुल सांकृत्यायन


लोकशाही अधिकारांवर होणारे हल्ले, धर्मांध शक्तींच्या वाढत्या कारवाया आणि भांडवलदारांपुढे नतमस्तक होणारी राज्यसत्ता. अशा आजच्या काळात लेखक विचारवंतांनी काय भूमिका घ्यावी. कालसुसंगत ठरणारी, वैज्ञानिक पाया असलेली, जनहिताची भूमिका कोणती? एखादी भूमिका घेताना कशाचे भान हवे? लेखक विचारवंतांची बांधिलकी कशाशी हवी? नेमकी भूमिका घ्यावी की मध्यममार्ग अनुसरावा? असा आजचा सगळा गोंधळलेला काळ आहे. अशा साचलेल्या, थिजलेल्या क्षणी सहजपणे आठवतात राहुल सांकृत्यायन. लेखक, इतिहासकार, पुरातत्त्ववेत्ता, साम्यवादी विचारवंत, प्रवासवर्णनकार, तत्त्वान्वेषी, बौद्ध तत्त्वज्ञानाचे अभ्यासक व बहुभाषाविद अशा असंख्य उपाध्या त्यांच्या नावाशी जोडल्या गेलेल्या आहेत. पण ही त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची वैशिष्ट्ये असली तरी त्यांना वेगळेपण देणार्या बाबी दुसर्याच आहेत, ज्यामुळे ते महान लेखक विचारवंतच नाही तर जनतेचे सांस्कृतिक सेनापती ठरतात.

Subscribe Now !

Get instant access to the complete Watsaru archives

New 3-Month Subscription to Digital Archives at just Rs 350 for India and $15 for overseas users.

Subscribe