97632 06212 pwatsaru@yahoo.com

आणखी एक क्षुल्लक अंदाजपत्रक


एकशे अकरा मिनिटांत 12,187 शब्द ः तशी ही एक मोठीच कामगिरी म्हटली पाहिजे. या दरम्यान कुणीही अडथळे निर्माण केले नाहीत, ही गोष्ट खरी असली तरी त्याचं कारण आदरणीय वित्तमंत्र्यांनी जवळपास संपूर्ण सदनालाच झोपेला लावलं होतं, हे होतं. आजवर मी अनेक अंदाजपत्रकीय भाषणे ऐकलेली आहेत. डॉ. मनमोहन सिंग हे काही फार पट्टीचे वक्ते होते असे मी म्हणणार नाही, पण जेटली यांनी त्यांच्यावरही कडी करून दाखवली. ही कामगिरी त्यांना कशी शक्य झाली? गेल्या दोन अंदाजपत्रकांमध्ये त्यांनी अगदी पन्नास-शंभर कोटी रुपये कुणाकुणाला वाटले आहेत याची लांबलचक यादी वाचून दाखवली होती. या वेळेला त्यांनी ही पद्धत बदलली. अर्थात याही वर्षी त्यांनी आधीच्या काँग्रेस नेतृत्वातील आघाडी सरकारने वित्तीय पातळीवर देशाचे कसे वाटोळे केले होते, जगभरातच कशी बिकट आर्थिक स्थिती आहे आणि आपण मात्र देशाच्या अर्थकारणाला कसे जगाच्या नकाशावर चमकवते ठेवले आहे ही जुनीच रेकॉर्ड वाजवली. पण रोचक बाब अशी की, हे सगळे त्यांनी दोन मिनिटात आटोपले.

Subscribe Now !

Get instant access to the complete Watsaru archives

New 3-Month Subscription to Digital Archives at just Rs 350 for India and $15 for overseas users.

Subscribe