97632 06212 pwatsaru@yahoo.com

लोककला आणि समाजप्रबोधन


लोककलेचा जन्म मानवाच्या जन्माबरोबर झाला आहे. कारण अभिव्यक्ती ही मानवाची नैसर्गिक गरज आहे. जन्मत:च मानव रडण्यातून अभिव्यक्त होतो आणि जसजसं त्याचा बौद्धिक, मानसिक विकास होत जातो तसतसे तो अभिव्यक्त होण्याच्या विविध कला आत्मसात करतो आणि त्याद्वारा आपल्या भावना व्यक्त करतो. अशा प्रकारे मानवाकडून व्यक्त होणार्या कलांचे दोन प्रकारे वर्गीकरण करता येते - 1. भाषेची उत्पती होण्याच्या आधीच्या कला : उदा. शिल्पकला, चित्रकला, नृत्यकला, अभिनयकला इ. 2. भाषेच्या उत्पत्तीनंतरच्या कला : उदा. गायनकला, कीर्तनकला, साहित्यकला इ. या सार्या कलांना आपण लोककला असे म्हणतो; ज्यांचा संबंध लोकसंस्कृतीची आहे. म्हणजे लोकसंस्कृतीचं प्रतिबिंब लोककलांत दिसतं तर लोककलांतूनच लोकसंस्कृती घडत असते.