97632 06212 pwatsaru@yahoo.com

कुडाची शाळा


चाकोरीबद्ध शिक्षणापेक्षा अनौपचारिक शिक्षण देण्याचा आग्रह करणारी कुडाची शाळा पुणे जिल्ह्यात (ढोलेमळा, मोरगाव, ता. बारामती, जि. पुणे) सुरू झाली आहे. औपचारिक शिक्षण देणार्या ज्या शाळेत आपण शिक्षण घेतले त्यापेक्षा ही शाळा वेगळी आहे. बिनभिंतीची शाळा म्हणजे नियंत्रित शिक्षणाऐवजी खुलेपणा या शाळेत आहे. शाळा हा शब्द उच्चारता आपणास वाटते की, पहिले ते दहावीचे विद्यार्थी या शाळेत असतील. तसे मात्र या शाळेत विद्यार्थी नाहीत. मग ही शाळा कशी आहे, असा प्रश्न नक्कीच आपल्या मनात निर्माण होतो. कुडाची शाळा ही संकल्पना सुरेश खोपडे (निवृत्त आयपीएस अधिकारी) यांची. निसर्गाच्या सान्निध्यात आबालवृद्धांना वैश्विक दृष्टिकोन देऊन नवी दिशा दाखवणारी शाळा उभी करण्याचा विचार ढोलेमळा येथे प्रत्यक्षात उतरविण्याचा प्रयत्न सुरू आहे.

Subscribe Now !

Get instant access to the complete Watsaru archives

New 3-Month Subscription to Digital Archives at just Rs 350 for India and $15 for overseas users.

Subscribe