97632 06212 pwatsaru@yahoo.com

ब्राह्मणी पितृसत्तेच्या आकलनाचा पेच


उमेश बगाडे पितृसत्ता ही विश्वव्यापी सामाजिक संस्था आहे. मातृसत्ताक गण समाजाचा अपवाद वगळता जगातील सर्व प्रकारच्या समाजांमध्ये तिचे अस्तित्व आढळते. भारतातही पितृसत्ताक समाजरचना कार्य करते. मात्र, एतद्देशीय सामाजिक अवकाशात उभी असल्याने तिचे विशिष्ट असे रूप उभे राहते. भारतातील पितृसत्तेची विशिष्टता ज्या अनेक कारणांनी घडते त्यामध्ये तिचा जातिसंस्थेशी असलेला संबंध महत्त्वाचा आहे. भारतीय पितृसत्ता ही जातीच्या समन्वयात उभी राहते. जातीच्या अस्तित्वाला ती कारणीभूत होते. उत्पादनपद्धती व विनिमय संबंधातून आकार घेणार्या जातीच्या भौतिकतेला ती आधार पुरवते. तिचा इतिहासही इतर पितृसत्तांपेक्षा वेगळा आहे. गण ते जात या सामाजिक स्थित्यंतरांमध्ये भारतीय पितृसत्ता घडली व जातिव्यवस्थेतील स्थित्यंतरामधून ती विकसित होत राहिली. भारतीय पितृसत्तेचे जे वेगळेपण उभे राहते ते तिला पायाभूत असलेल्या ‘ब्राह्मणवाद’ या वैचारिक व सांस्कृतिक यंत्रणेमुळे. जडणघडणीच्या काळापासून जातिव्यवस्थेचा व पितृसत्तेचा निर्वाह करण्याचे काम ब्राह्मणवादाने केले असल्यामुळे भारतातल्या पितृसत्तेला ‘ब्राह्मणी पितृसत्ता’ असे संबोधण्यात येते.

Subscribe Now !

Get instant access to the complete Watsaru archives

New 3-Month Subscription to Digital Archives at just Rs 350 for India and $15 for overseas users.

Subscribe