97632 06212 pwatsaru@yahoo.com

मोहनकुमार विरुद्ध कन्हैय्याकुमार


रा. स्व. संघाने आपला हुकमाचा पत्ता टाकला पण त्याला काही डाव जिंकता आला नाही. हा पत्ता म्हणजे राष्ट्रवाद. राष्ट्रवाद हा संघाचा अत्यंत भेदक आणि टोकदार उपाय असतो. अनेक वर्षांपासून फक्त गणवेश, संचलन, तथाकथित शिस्त आणि देशभक्तीचे शाब्दिक बुडबुडे या बळावर संघ राष्ट्रवादी ठरवला गेला आहे. तो जे जे करतो ते राष्ट्रासाठी असे वर्णन तो करीत राहतो आणि संघाला मानणारे लोकही. त्यात पत्रकार, सहानुभूतीदार, नोकरदार वगैरे सारे आले. म्हणून संघाकडे राष्ट्रवादी वृत्ती कोणती व राष्ट्रद्रोही कोणती हे ठरवायचा अधिकार या लोकांनी दिल्यासारखाच आहे. कसलेही ठोस कार्य न करता संघ एखाद्या ऐतखाऊसारखा राष्ट्रवादी होऊन बसला आहे. ना स्वातंत्र्य चळवळ, ना संविधाननिर्मिती, ना संयुक्त महाराष्ट्र, ना तेलंगण, ना राष्ट्रीयीकरण, ना दुष्काळनिवारण, ना बालमृत्यू नियंत्रण! कशातही संघ काही बोलला ना सहभागी झाला. तरीही तो राष्ट्रवादी! ब्राह्मण्य यालाच म्हणतात. प्रमाणपत्रे देण्याचा पवित्र अधिकार संघाकडेच आणि महत्त्वाच्या घडामोडींपासून अलिप्त राहण्याचा हक्कही त्याचाच. कर्तृत्वशून्य आणि पळपुटा संघ तरीही प्रतिष्ठित, सद्विचारी आणि राष्ट्रसेवक कोणी ठरवला? फक्त प्रदर्शनीय कार्य करणारा संघ मग राष्ट्रवादी कसा आणि का?

Subscribe Now !

Get instant access to the complete Watsaru archives

New 3-Month Subscription to Digital Archives at just Rs 350 for India and $15 for overseas users.

Subscribe