97632 06212 pwatsaru@yahoo.com

लबाडांचा उपद्रव


रोहित वेमुलाच्या संस्थात्मक खुनानंतर हिंदुत्ववादी शक्तींनी जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांवर जोरदार हल्ला केला आहे. यापूर्वी आयआयटी चेन्नई येथील आंबेडकर पेरियार स्टडी सर्कलवर प्रतिबंध लादण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी त्याविरुद्ध जोरदार आंदोलन केल्यानंतर ते प्रतिबंध उठवण्यात आले. या सगळ्या घटनाचक्रामधून एक स्पष्ट असा आकृतिबंध लक्षात येतो. अभाविप विद्यार्थ्यांवर देशद्रोहाचे आरोप लावते व त्यानंतर लागलीच भाजपचा मंत्री संस्थात्मक प्रशासनाला धमकी देतो आणि ही प्रशासकीय यंत्रणा अशा धमकीला घाबरून त्यांच्या आदेशास संमती देते. आयआयटी आणि हैदराबाद सेंट्रल युनिव्हर्सिटीच्या घटनाचक्रामध्ये प्रशासकीय यंत्रणेस धमकाविण्याचे काम मानव संसाधन विकासमंत्री स्मृती इराणीने पार पाडले. भारतातील विद्यापीठाचे भगवेकरण करण्याचा चंगच त्यांनी मांडला आहे. यावेळेस भारताचे गृहमंत्री राजनाथसिंग यांनी दंगा कारस्थानाचे वाचन व्यवस्थित करून देशातील पोलीसयंत्रणेला राबवून घेतले.

Subscribe Now !

Get instant access to the complete Watsaru archives

New 3-Month Subscription to Digital Archives at just Rs 350 for India and $15 for overseas users.

Subscribe