97632 06212 pwatsaru@yahoo.com

पनामाचा इशारा


‘पनामा पेपर्स’ नावाने झालेल्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील भांडाफोडीतून अत्यंत स्फोटक कागदपत्रे जगजाहीर होण्याचे कोणते राजकीय आणि तत्त्ववैचारिक परिणाम संभवतील? याचे अगदी संक्षेपात उत्तर द्यायचे तर त्या त्या देशातील संदर्भांनुसार ते ठरतील, असे म्हणता येते. विशेषतः राजकीय परिणामांबद्दल नेमका अंदाज वर्तवणे अवघड आहे. पण ही कागदपत्रे जगजाहीर होण्याच्या ऐतिहासिक घडामोडीला जो प्रतिसाद मिळेल तो बर्यापैकी गोंधळाचा आणि मुख्य म्हणजे त्यातील ‘ऐतिहासिक’ या घटकाला साजेसा असणार नाही याचा अंदाज मात्र आपण नक्कीच बांधू शकतो. या भांडाफोडीने अनेक प्रकारच्या कृत्य-अपकृत्यांची विणलेली गुंतागुंतीची जाळी बेनकाब झाली आहेत : बेकायदेशीरपणा, अपलाप आणि कायदेशीर हवाला व्यवहार हे सगळेच त्यात आहे. चीन आणि रशियासारख्या एकाधिकारशाही असलेल्या देशांमध्ये ही भांडाफोड फारशी नवलाची वाटतच नाही, असेही अनेक भाष्यकारांनी म्हटले आहे.

Subscribe Now !

Get instant access to the complete Watsaru archives

New 3-Month Subscription to Digital Archives at just Rs 350 for India and $15 for overseas users.

Subscribe