97632 06212 pwatsaru@yahoo.com

पनामा पेपर्स : शिक्षा झालीच पाहिजे!


फार वर्षांपूर्वी मी एका बांधकाम कंपनीत नोकरीला होतो. ह्या कंपनीचा ट्रक दर महिन्याला जवळच्या शहरातील पेट्रोल डिलरकडून चोवीस बॅरल्स पेट्रोल भरून आणायचा. एकदा कंपनीच्या खरेदी-विक्रीचा व्यवहार करणार्या माझ्या मित्रासोबत मी होतो. ट्रकमधील सर्व बॅरल्स भरल्यावर मित्रानं दर बॅरलला एकशेवीस रुपयांप्रमाणे पैसे दिले, पावती घेतली. त्यानंतर डिलरने त्याच्या पुढ्यात साठ रुपये ठेवले, ते खिशात घालून तो उठला. माझ्या चेहर्यावरील प्रश्नचिन्ह पाहून तो किंचित हसून म्हणाला, दर ट्रीपमध्ये चोवीस बॅरल्समधील एक बॅरल तेथूनच भरलेला येतो आणि भरलेलाच परत जातो. आपले साहेब येथून गेल्यावर भरलेले बॅरल्स मोजतात, इकडे येताना रिकामे बॅरल्स तपासण्याची त्यांना गरज वाटत नाही. मी चोवीस बॅरल्सचे पैसे देऊन तेवीस बॅरल्स घेतो, तो तेवीस बॅरल्स पेट्रोल देऊन चोवीस बॅरल्सची विक्री दाखवतो. निम्मे पैसे त्याचे, निम्मे माझे. अॅट नो रिस्क.

Subscribe Now !

Get instant access to the complete Watsaru archives

New 3-Month Subscription to Digital Archives at just Rs 350 for India and $15 for overseas users.

Subscribe