97632 06212 pwatsaru@yahoo.com

ती स्त्री जिचे लग्न क्रांतीने ठरवले


चिनी भाषेत एक म्हण आहे, ‘बाण त्याच पक्षाला लागतो जो त्याचे डोके वर काढतो.’ मी रेडिओवर निवेदक होऊन फार काळ लोटला नव्हता, पण मला येणारी चिनी स्त्रियांची प्रचंड पत्रे, मिळणारी बक्षिसे, माझ्या कार्यक्रमाची वाढलेली लोकप्रियता यांमुळे अनेकदा माझ्या सहकर्मचार्यांचा खिल्लीवजा सूर असे. पण चिनी भाषेत म्हणतात त्याप्रमाणे आपण सरळ उभे असू, तर वाकड्या सावलीला का घाबरायचे? त्यामुळे मी प्रयत्नपूर्वक हसतमुखाने प्रत्येक असूयेला सामोरी गेले. अखेर, चिनी स्त्रियांचा आवाजच माझ्या सहकर्मचार्यांनाही माझ्याजवळ घेऊन आला.