97632 06212 pwatsaru@yahoo.com

भारताची अर्थस्थिती : धारणा आणि धोरणदिशा


‘भारताची अर्थस्थिती : धारणा आणि धोरणदिशा’ या आमच्या 1 ते 15 मार्च 2016 च्या ‘वाटसरू’तल्या लेखावर रमेश पाध्ये यांनी 1 ते 15 एप्रिल 2016 च्या ‘वाटसरू’त दिलेली प्रतिक्रिया वाचली आणि हताश झालो. पाध्ये यांच्याकडून हे निश्चितच अपेक्षित नव्हतं किंवा खरं म्हणजे अलीकडे हेच अपेक्षित होतं. आमच्या प्रदीर्घ लेखात शिक्षण, आरोग्य, रोजगार, संशोधन, घरं किंवा झोपडपट्ट्या, सरकारी खर्च अशा अनेक गोष्टींबाबत भारताची काय स्थिती आहे हे इतर अनेक देशांशी तुलना करून सविस्तरपणे सखोल आकडेवारीसकट मुद्देसूद मांडण्याचा आम्ही प्रयत्न केला होता. त्यातले महत्त्वाचे मुद्दे सोडून, त्याचा गाभा न लक्षात घेता, त्यातले कुठलेसे चार-पाच आकडे घेऊन उगाचच त्यावर अशी फुटकळ आणि निरर्थक टीका बघून आम्ही तर हादरलोच. ‘सगळं ठाकठीक चाललंय, फक्त काही लहानसहान गोष्टी ठीक केल्या पाहिजेत’ असा जो ते पवित्रा घेऊ इच्छितात त्याच्याशी प्रस्तुत लेखक संपूर्णपणे असहमत आहे.