97632 06212 pwatsaru@yahoo.com

जयभीम विरुद्ध जय संविधान


आंबेडकरांएवढा निरुपद्रवी माणूस भारतात दुसरा कोणी झाला नाही असे यंदाच्या 14 एप्रिलच्या आणि त्यानिमित्ताने झालेल्या सरकारी वातावरणनिर्मितीने वाटून गेले तेवढेच कशाला, आंबेडकर हा एक संत, साधुपुरुष होता आणि तो भाजपखेरीज कोणालाही कळला नाही असेही आम्हाला वाटले. एक राहिलेच, संघ परिवाराने या माणसाला कडकडून कवटाळले म्हणजे नक्कीच तो एक धार्मिक, पापभीरू आणि महान राष्ट्रसेवक होता हेही भारताला कळून चुकले. एरवी मिठी मारणे, कवेत घेणे, कवटाळणे, कडकडून भेटणे या गोष्टींना संघात मज्जाव असतो; परंतु आंबेडकरांबाबतीत शारीरिक स्पर्शाने काही सांगितले नाही तर आपल्याला जातीयवादी मानतील अशी भीती संघ परिवाराला वाटल्याचे नक्कीच जाणवत होते. घरी आलेल्या पाहुण्यावर जसा आग्रहाचा मारा जेवणावेळी अन् आरामाचा भडिमार दिवसभर केला जातो, तसा आंबेडकरांवर संघ परिवाराने केला. पाहुण्याने आदरातिथ्याचे कौतुक गावभर करावे अन् पाहुणाच असल्याने एकदाचा पाहुणचार उरकून आपल्या रोजच्या कार्याला जुंपावे असे जसे यजमान योजतो, अगदी तस्से संघाने आंबेडकरांना वागवले. ‘व्यवस्था’ उत्तम होती, पाहुण्यांकडची मंडळी सुखावली आणि आतिथ्याचे पुण्य पदरी पडले; यामुळे संघ परिवार खुशीत असल्याचे दिसून आले. महिनाभर ‘जयभीम’ म्हणत राहा असे ज्या ज्या स्वयंसेवकांना सांगितले होते, त्या सर्वांची अवघडलेली स्थिती पूर्वपदावर आल्याचेही कळून आले.

Subscribe Now !

Get instant access to the complete Watsaru archives

New 3-Month Subscription to Digital Archives at just Rs 350 for India and $15 for overseas users.

Subscribe