97632 06212 pwatsaru@yahoo.com

महाराष्ट्र समजून घेण्यासाठी : ‘महाराष्ट्र वार्षिकी 2016’


सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षांचे विद्यार्थीच नव्हे तर महाराष्ट्राविषयी जाणून घेण्यास उत्सुक असणारे नागरिक द युनिक अॅकॅडमीच्या ‘महाराष्ट्र वार्षिकी’च्या प्रतीक्षेत असतात. माहिती व विश्लेषणाचा संगम असलेला, तुकाराम जाधव संपादित महाग्रंथ नुकताच प्रकाशित झाला. 2008 साली महाराष्ट्राविषयी वर्षभरातील सर्व घडामोडी एकत्र एका ग्रंथात आणि तेही त्याच्या विश्लेषणासह देण्याचा प्रयत्न सुरू झाला. ‘दरवर्षी असा अंक काढणे शक्य नसून दोन-तीन वर्षांतच हा प्रयोग संपुष्टात येईल’, अशा शुभेच्छाही सुरुवातीस मिळाल्या. अर्थात पहिल्या वर्षी काही मर्यादाही त्यात होत्याच. महाराष्ट्र वार्षिकीचे हे सलग आठवे वर्ष. आठ वर्षांचे सातत्य, टीम वर्क आणि पूर्वीच्या तुलनेत अधिक परिपक्वता ही तिची वैशिष्ट्ये.