97632 06212 pwatsaru@yahoo.com

नेमाडेंचा सोयीचा व पोकळ देशीवाद आणि कसबेंचा भक्कम प्रतिवाद (पूर्वार्ध)


भालचंद्र नेमाडे गेल्या पन्नास वर्षांपासून लेखक आणि समीक्षक म्हणून वावरत आहेत. त्यांनी त्यांचा एक अड्डा निर्माण केला असून मराठी साहित्यविश्वात एक दबदबा आणि दबावगट निर्माण केला आहे. मुळात इतर साहित्यिकांच्या साहित्यविश्वातील श्रेष्ठत्वाला आणि योगदानाला नाकारूनच या क्षेत्रात प्रवेश केलेल्या नेमाडेंनी त्यांची ती मूळ प्रवृत्ती आजही टिकवून ठेवली आहे. ज्यांनी त्यांच्यावर टीका करण्याचा प्रयत्न केला त्यांची नेमाडेंनी एक-दोन उलट्यासुलट्या विधानांतून तोंडे बंद केली. सविस्तर व साधार प्रतिवाद कधीही केला नाही. तसा प्रतिवाद न करणे त्यांनी ‘भूषण’ म्हणून मिरवले आहे. त्यांनी त्यांची भविष्याकडे पाठ करून भूतकाळाकडे निघालेली देशीवादी भूमिका रेटून नेली आहे. त्यांच्या अड्ड्यातल्या समीक्षकांकडून त्यांच्या त्या भूमिकेचा गौरव करून घेतला आहे. ती भूमिका कमालीची मौलिक असल्याचे त्यांच्याकडून सातत्याने वदवून घेतले आहे.

Subscribe Now !

Get instant access to the complete Watsaru archives

New 3-Month Subscription to Digital Archives at just Rs 350 for India and $15 for overseas users.

Subscribe