97632 06212 pwatsaru@yahoo.com

सैराट : परिणामकारकरीत्या मांडलेले वास्तव


आपल्याच मातीमध्ये रुजलेल्या, फोफावलेल्या अनेक दाहक वास्तवांना इतक्या सरळपणे, सहजपणे आपल्यासमोर दिग्दर्शक नागनाज मंजुळे यांनी ठेवल्यात की, त्यातून एक सैराट वादळ तर आपल्या डोळ्यांसमोरून आपल्याला सुन्न करत घोंघावत जातंच पण त्याचबरोबर आपल्याला अंतर्मुखही करतं. आर्ची व परशाची प्रेमकहाणी. समाजातील दोन भिन्न स्तरांतील हे प्रेम जेव्हा फुलत असतं तेव्हाचा सुरुवातीचा भाग दृश्य स्वरूपात नेत्रसुखद असला तरीही ही वाट किती खडतर व दगडधोंड्यातून जाणारी आहे, कोणत्या पाषाणी वृत्तीला त्यांना सामोरं जायचं आहे, याची जाणीव प्रत्येक दृश्याच्या पार्श्वपटलावरून दिग्दर्शक करून देत असतो.

Subscribe Now !

Get instant access to the complete Watsaru archives

New 3-Month Subscription to Digital Archives at just Rs 350 for India and $15 for overseas users.

Subscribe