97632 06212 pwatsaru@yahoo.com

जया, तुझे काळे फासणे!


कोच्चीची जया पी. एस. सध्या स्वत:चा चेहरा आणि शरीरावर काळे फासत सार्वजनिक स्थळी निषेध नोंदवित आहे. तिला हे कार्य 125 दिवस करायचे आहे. तिच्या गावातील लोकं तिला एक तर वेड्यात काढत आहेत किंवा तिच्याकडे दूरवरून पाहिल्यावर भूत असल्याचे समजून घाबरत आहेत. पण जयाचा उद्देश अत्यंत व्यापक आहे. तिला या देशात मानवतेचा संदेश द्यायचा आहे. या देशातील सर्व स्त्री-पुरुष समान दर्जाचे आहेत, जात, वर्ण, धर्म किंवा संपत्तीवरून कोणीही उच्चस्थानी किंवा निम्नस्थानी नाही, सर्वांना समान दर्जाची वागणूक द्या असा संदेश देण्यासाठी ती स्वत:चे तोंड काळे करीत आहे. काळ्या रंगाबाबत आपल्या देशात वेगळ्या धारणा आहेत. त्यामुळे जयाने हा रंग निवडला आहे. स्वत:चे तोंड काळे करून घेण्यासाठी खूप हिंमत लागत असते. हे काम कोणा येरागबाळ्याचे नाही. समाजाच्या विरोधात जाऊन जयाने हे व्रत स्वीकारले आहे.

Subscribe Now !

Get instant access to the complete Watsaru archives

New 3-Month Subscription to Digital Archives at just Rs 350 for India and $15 for overseas users.

Subscribe