97632 06212 pwatsaru@yahoo.com

Tropic of Cancer : अश्लीलता आणि कायदा


‘अमेरिकेत जन्मलेला परंतु जन्मभूमीपासून दूर पॅरिसमध्ये बहुतांश जीवन व्यतित केलेला हेन्री मिलर हा भारतातील ख्यातनाम लेखकांपैकी एक आहे.’ ह्या विधानामुळे सामान्य वाचकांचा गोंधळ होऊ शकतो. मिलरचे एकही पुस्तक त्यांनी वाचलेले नसणार. (हेच विधान मी लेखकाचे नाव न घेता किंवा नीटसा उच्चार न करतादेखील ‘माइन काम्फ’बद्दल केले असते तर वाचक माझ्याशी नक्कीच सहमत झाले असते. सबंध भारतातील कुठल्याही पुस्तकांच्या दुकानात ‘माइन काम्फ’ मिळते ह्यासारखी विचित्र आणि दुःखद गोष्ट कोणती?) मी हे अतिशय सुज्ञपणे बोलतोय. मुंबईच्या हुतात्मा चौकातील पुस्तकांच्या गल्लीतून फेरफटका मारा, किंवा किंग्ज सर्कलच्या फूटपाथवरून जा, एखाद्या दुपारी दिल्लीतील दरियागंजला जा किंवा एखाद्या पावसाळी संध्याकाळी कोलकात्याच्या प्रेसिडेन्सी कॉलेजजवळील कॉलेज रस्त्यावरून जा. तुम्हाला हेन्री मिलरची पुस्तके रचून ठेवलेली दिसली नाहीत तर नवल.

Subscribe Now !

Get instant access to the complete Watsaru archives

New 3-Month Subscription to Digital Archives at just Rs 350 for India and $15 for overseas users.

Subscribe