97632 06212 pwatsaru@yahoo.com

उड्डाणपूल पडतच राहतील!


शिरीष पटेल 31 मार्च 2016 रोजी कोलकात्यामध्ये नव्याने उभा राहत असलेला उड्डाणपूल पडला. या दुर्घटनेत 26 जणांना प्राण गमवावे लागले तर अन्य 90 जण जखमी झाले. त्याआधी काही महिन्यांपूर्वीच डिसेंबर 2015 मध्ये चेन्नईमध्ये आलेल्या पुराने 280 जणांचा जीव घेतला होता. पूर ओसरायला इतका दीर्घ काळ का लागला हे एक गौडबंगालच होते. या दोनच दुर्घटना नव्हेत तर अलीकडच्या काही वर्षात घडलेल्या अनेक दुर्घटनांचे मूळ कारण एकच आहे आणि ते म्हणजे भारतातील नागरी अभियांत्रिकी व्यवसायाची झपाट्याने होणारी घसरण. सल्लागार संस्थांची निवड करण्याच्या चुकीच्या शासकीय धोरणामुळे हा र्हास सुरू झाला आणि सातत्याने वाढत गेलेला आहे. काय आहे धोरण? नागरी अभियांत्रिकी सेवा प्राप्त करताना निकष हा सर्वाधिक चांगले काम कोण देऊ शकतो हा नसून सर्वाधिक स्वस्त काम कोण देऊ शकतो हा असतो हे ते धोरण होय. एक साधी गोष्ट म्हणजे डॉक्टर, वकील अथवा सी.ए.सारख्या अर्थसल्लागाराची सेवा प्राप्त करताना असा निकष वापरला जातो का?

Subscribe Now !

Get instant access to the complete Watsaru archives

New 3-Month Subscription to Digital Archives at just Rs 350 for India and $15 for overseas users.

Subscribe