97632 06212 pwatsaru@yahoo.com

शहीद भगतसिंह समग्र वाङ्मय


एखाद्या क्रांतिकारकाविषयी आपण खूप वाचलेलं असत. त्याच्या क्रांतिकार्याविषयी, हौतात्म्याविषयी आपल्याला बरीच माहिती असते. तरीदेखील खुद्द त्या क्रांतिकारकाच्या लेखणीतून वेळोवेळी प्रकटलेले त्याचे विचार, वाचन, मनन-चिंतन उलगडून दाखवणारे लेख वाचकाला समग्र भान देण्यासाठी खूप महत्त्वाचे ठरतात. कारण त्यामुळे आपण त्या क्रांतिकारकाला आतून-बाहेरून खर्या अर्थी समजून घेऊ शकतो.