निसर्ग आणि भौतिक वास्तवामागे काही शक्ती आहेत. त्याच्यामागे काही कार्यकारणभाव आहे, याची जाणीव घनवादापूर्वीच दृक्-प्रत्ययवादी कलाकारांना झाली होती. व्हिन्सेट व्हॅन गॉग, जार्जेस-सरा, पॉल सेझाँ हे दृक्-प्रत्ययवादी चित्रकार या जाणिवेचा शोध घेतच होते. निसर्गातच भौमित्तिक आकार आहेत. प्रकाशामुळे दिसणार्या वस्तू तीन मित्तीच नाहीत तर ती बहुमित्तीत आहे. रंग लहरींनी नाही तर कणाकणांनी तयार होतो. अशा निसर्गातल्या डोळ्यांना न दिसणार्या जाणिवा परंतु त्याचा आलेला प्रत्यय दृक्-प्रत्ययवादी चित्रकारांनी नोंदवला. दृक्-प्रत्ययवादी जाणिवांतून घनवाद आणि पुढे अमूर्तवाद चित्रकलेत प्रस्थापित झाला.
Subscribe Now !
Get instant access to the complete Watsaru archives
New 3-Month Subscription to Digital Archives at just Rs 350 for India and $15 for overseas users.