97632 06212 pwatsaru@yahoo.com

दलित स्त्रीवादाशी वैचारिक देवाणघेवाण


'वाटसरू'च्या 1 ते 15 जून 2016 या अंकातील अभिनया रमेश यांचा 'दलित स्त्री आणि स्त्रीवादी जाणिवा' हा लेख वाचला आणि त्यात व्यक्त केलेल्या काही विचारांशी मी सहमत होऊ शकले नाही. त्यांच्याशी देवाणघेवाण करावी म्हणून या लेखाचा प्रपंच करावासा वाटला.भवरीदेवीचा लैंगिक छळ झाल्यावर कामाच्या ठिकाणी असा जो छळ होतो, त्यासाठी नवीन कायदा केला पाहिजे हे लक्षात आले आणि विशाखा संस्थेने त्यात लक्ष घालून सर्वोच्च न्यायालयाकडे धाव घेतली. त्यावेळी सर्वोच्च न्यायालयाने काही निर्देशक तत्त्वे सांगितली व कायदा होईपर्यंत त्यांचे पालन करण्याचे आवाहन केले.