97632 06212 pwatsaru@yahoo.com

विचारमंथन


काही दिवसांपूर्वी औरंगाबाद येथे भगवानराव देशपांडे यांच्या स्फुट लेखांचा संग्रह 'विचारमंथन' या नावाने प्रसिद्ध झाला. या संग्रहातील लेखांचा 'स्फूट' अशा शब्दात मी यासाठी उल्लेख केला की अवघ्या 163 पृष्ठांत या संग्रहात एकतीस लेख समाविष्ट झालेले आहेत. 'लो. टिळक', 'हैद्राबाद मुक्तिसंग्रामातील दलितांचा सहभाग', '370 वे कलम', 'डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची मराठवाड्याची चिंता', 'कॉ. डांगे यांच्या स्मारकाविषयी', 'न्यायसंस्थेचे स्वातंत्र्य', 'योजना आयोगाची बरखास्ती' इत्यादी लेखांची शीर्षकेही लक्षात घेतली तर त्या लेखांचे विषय 'स्फुट' स्वरूपात लेखन करून आटोपती घ्यावीत असे नाहीयेत हे आपणाला जाणवू शकते. काही लेखांच्या शीर्षकावरूनही त्या लेखांचे वेगळेपण आपल्या लक्षात येऊ शकते.