97632 06212 pwatsaru@yahoo.com

डॉ. एलिनॉर झेलिएट : एक अभ्यासू व्यक्तिमत्त्व


अमेरिकेतल्या डॉ. एलिनॉर झेलिएट यांचे नाव भारतातल्या विशेषतः सामाजिक चळवळीत आणि दलित समाजात सर्वांच्याच परिचयाचे आहे. दि. 5 जून 2016 रोजी एलिनॉर यांचं वयाच्या 89 व्या वर्षी कॅन्सरने निधन झालं. अभ्यासू वृत्ती आणि अतिशय लाघवी मृदू असे हे व्यक्तिमत्त्व होतं. अमेरिकेतल्या मिनिसोटा या शहरातल्या कार्लटन महाविद्यालयात त्या इतिहास विषय शिकवत असत. अनेक संशोधनात्मक लेख त्यांनी लिहिले. अनेक संस्था-संघटनांच्या त्या पदाधिकारी होत्या. इतिहासात उत्तुंग अशी कामगिरी केलेल्या असाधारण व्यक्तिमत्त्वांबाबत सखोल माहिती घेण्याकडे त्यांचा कल होता.