97632 06212 pwatsaru@yahoo.com

सरकारसाठी मैलासफाई


भारतातील हाती मैलासफाईविरोधात मोहीम चालवणारी एक सर्वांत मोठी संघटना असलेल्या 'सफाई कर्मचारी आंदोलना'चाही भर कोरड्या शौचालयांवर बंदी आणण्याला असतो आणि त्यापाठोपाठ मैला टाकीसफाईवरील बंदीची मागणी केली जाते. 'हाती मैलासफाई रोजगारावर बंदी व अशा कामगारांचे पुनर्वसन अधिनियम 2013'मध्ये हाती मैलासफाईची व्यापक व्याख्या असायला हवी असा युक्तिवाद करत सफाई कर्मचारी आंदोलनाने महत्त्वाचे हस्तक्षेप केले आहेत, हे खरे; पण वास्तवात त्याचा परिणाम झालेला दिसत नाही. स्थानिक स्वराज्य संस्था, बिगर सरकारी संस्था व अगदी संयुक्त राष्ट्रांमध्येही हाती मैलासफाईचा विचार केवळ कोरड्या शौचालयांसंदर्भात आणि सार्वजनिक ठिकाणी केल्या जाणार्या मैलाविसर्जनासंदर्भात केला जातो.

Subscribe Now !

Get instant access to the complete Watsaru archives

New 3-Month Subscription to Digital Archives at just Rs 350 for India and $15 for overseas users.

Subscribe