97632 06212 pwatsaru@yahoo.com

बौद्धधम्मविरोधाचे व दलितद्वेषाचे गुजरात मॉडेल


विजय कुंजीर मे 2014 मध्ये दिल्लीत झालेल्या सत्तांतरात नरेंद्र मोदी हे भारताचे पंतप्रधान झाले. त्यानंतर भारत सरकारने ज्या प्रकारचे परराष्ट्रधोरण अवलंबिले त्यामध्ये अत्यंत महत्त्वाचा जो भर आहे तो बुद्धिझमवर. भारताचे इतर देशांशी असलेले संबंध हे बुद्धिझमच्या माध्यमातून समजून घेणे आणि बुद्धिझमच्या माध्यमातून त्यांना पुढे नेण्याचा प्रयत्न केला गेला आहे. बौद्ध धर्माशी आणि त्या त्या देशाशी असलेला भारताचा संबंध हा अधिक दृढ करणे अशा सर्व प्रकारच्या गोष्टी 2014 नंतर एका अर्थाने सुरू झाल्या. मोदींची पहिली भेट होती भूतानला. या भेटीने व त्यानंतर आपल्याला असे पाहायला मिळते की प्रत्येक वेळेला ते भारताचा आणि या सगळ्या देशांचा असलेला संबंध बुद्धिझमच्या माध्यमातून कसा पाहतायत आणि कसा आहे याच्यावर जास्तीत जास्त जोर देण्याचा प्रयत्न करतात.

Subscribe Now !

Get instant access to the complete Watsaru archives

New 3-Month Subscription to Digital Archives at just Rs 350 for India and $15 for overseas users.

Subscribe