97632 06212 pwatsaru@yahoo.com

धन्य त्या नारदी कळा


“छे, छे, छे! संघाला प्रसिद्धीची मुळीच गरज नाही. संघ पत्रकारांच्या मागे कधी फिरत नाही. आमचे कार्य शांतपणे चालू असते. कोणाला वाटले तर येतील आमच्याकडे. नाही तर राहिले...!'' असा अत्यंत फणकारलेला अन् तुसडा दावा संघ सदैव करीत असतो. विशेषतः चारचौघांत आणि सभा, बैठकांच्या ठिकाणी मुद्दाम. जणू संघकार्य हे फार प्रसिद्धीविन्मुख, विरागी आणि ईश्वरी कार्य. देव कधी भक्तांना म्हणतो का, यावे माझ्या दर्शनाला. बघा मी तुमचे भले करीन...! अगदी तसेच संघाचे. आले तर येतील, नाही तर जातील... म्हणजे कर्म करीत राहा, फलाची आशा करू नये असा थेट कृष्णाचा सल्ला आम्ही पाळतो असा संघाचा पवित्रा असतो.

Subscribe Now !

Get instant access to the complete Watsaru archives

New 3-Month Subscription to Digital Archives at just Rs 350 for India and $15 for overseas users.

Subscribe