97632 06212 pwatsaru@yahoo.com

ब्रेक्झिट : युरोपच्या विघटनाची सुरुवात?


युरोपीय आर्थिक समुदायातून (EU) बाहेर पडण्याबाबत 23 जूनला झालेल्या सार्वमतात Leave बाजूला 52% मते मिळाल्याने ब्रिटिश नागरिकांत या महत्त्वाच्या मुद्द्यावर मोठी विभागणी झालेली आहे हे स्पष्ट होते. जनमताचा आदर करण्यात येईल असे पंतप्रधान कॅमेरून यांनी जाहीर केले असल्याने आवश्यक त्या सर्व कायदेशीर/तांत्रिक बाबी पूर्ण होऊन युरोपीय समुदायाबरोबर ब्रिटनचे व्यापारी संबंध नेमके कसे राहतील हे निश्चित होण्यास दोन वर्षे तरी लागतील. पण युरोपीय समुदायातून ब्रिटन बाहेर पडला तर त्याचे सार्वभौमत्व परत मिळेल, ब्रिटिश नागरिक त्यांच्या उज्ज्वल (?) आर्थिक भवितव्याचे शिल्पकार बनतील असा ङशर्रींश पुरस्कर्त्यानी केलेला प्रचार बहुसंख्य मतदारांना पटला, यावरून विचार आणि प्रचार यांचे महत्त्व स्पष्ट होते. या सार्वमताच्या परिणामांची वर्तमान चर्चा वित्तीय बाजार पेठांमधील चढ-उतार आणि वित्तीय भांडवल प्रवाहांची बदलती दिशा यावर केंद्रित होणे साहजिक मानले पाहिजे.

Subscribe Now !

Get instant access to the complete Watsaru archives

New 3-Month Subscription to Digital Archives at just Rs 350 for India and $15 for overseas users.

Subscribe