97632 06212 pwatsaru@yahoo.com

जमील नख्श


वस्तू प्रतिमा आणि प्रतिबिंब या दोन्ही शक्यता घेऊन असते. एका दिशेने आलेल्या प्रकाशाच्या उलट्या दिशेला वस्तूची सावली किंवा प्रतिमा पडते. वस्तूचे प्रतिबिंब ही उलट्या अंगाने वस्तूसारखे तंतोतंत असते. म्हणजे वस्तूचे सादृश्य आणि वस्तूपासून पूर्णपणे मुक्त अशा दोन्ही शक्यता वस्तूतच आहेत. वस्तूचेच पुन्हा मूर्त रूप, तर वस्तूचेच पुन्हा अमूर्त रूप अशा मूर्त-अमूर्ताच्या शक्यता वस्तूमुळेच तयार होतात.वस्तू वास्तवाचेच संक्षिप्त रूप आहे. वास्तवाचेच बीजरूप आहे. त्यातून आलेल्या प्रत्ययाचा विस्तार मूर्त-अमूर्त रूपात होतो. वास्तववादी चित्रणाच्या प्रेरणा किंवा अमूर्त चित्राच्या प्रेरणा वास्तवाच्या प्रत्ययातून येतात. हा ‘दृक्-प्रत्यय.’ म्हणून दृक्-प्रत्यवादी विचारातून वास्तववादी आणि अमूर्त अशा दोन्ही अंगाचे प्रवाह तयार झाले.

Subscribe Now !

Get instant access to the complete Watsaru archives

New 3-Month Subscription to Digital Archives at just Rs 350 for India and $15 for overseas users.

Subscribe