97632 06212 pwatsaru@yahoo.com

संवेदनेकडून संज्ञेकडे : सय्यद हैदर रझा


भारताच्या स्वातंत्र्यानंतर भारतीय चित्रकारांची जी पहिली पिढी म्हणून जगासमोर आली, त्यात एम. एफ. हुसेन, के. एच. आरा, एफ. एन. सुझा, बाकरे आणि गाढे हे प्रोग्रेसिव्ह ग्रुपचे कलाकार म्हणून कलाक्षेत्रात जास्तच प्रभाव टाकून होते. यातच एस. एच. रझा हेही महत्त्वाचे आणि आपल्या समकालिनांपेक्षा वेगळे होते. हे वेगळेपण कायमच राहिले. एस. एच. रझा प्रचलितपणे निसर्गचित्रे काढत होते. इतर निसर्गचित्रकारांपेक्षा त्यांच्यात जे वेगळेपण होते, त्या वेगळेपणानेच ते पारंपरिक निसर्गचित्रणापेक्षा वेगळा निसर्ग रंगवत होते, त्याचाच विस्तार होत होत निसर्गापेक्षाही सृष्टीचेच सौंदर्य रंगवण्यापर्यंत झाला.