97632 06212 pwatsaru@yahoo.com

शिक्षणाचे प्र.जा.तंत्र


उघड आहे, नवे केंद्रीय शिक्षणमंत्री प्रकाश जावडेकर यांच्या नावाच्या आद्याक्षरांवर केलेली ही कोटी आहे. त्यांनी इ-राणी यांच्याकडून खाते घेतल्यानंतर संघाला शिक्षणात काय अपेक्षित आहे हे स्पष्टपणे सांगून टाकले. त्यामुळे देेशाचे शिक्षण मनु‘स्मृती’कडून प्र.जा.सत्ताकाकडे पाठवून आणि मुळात ते कसे बदलून टाकता येईल, त्याची वाटा-वळणे संघ ठरवतो आहे. जणू इराणीबाईंकरवी आराखडा करवून घेतला, त्याची अंमलबजावणी जावडेकरांकरवी होणार! जावडेकर पुणे पदवीधर मतदारसंघामधून विधानपरिषदेवर निवडून गेले होते. त्यावेळी त्यांनी शिक्षण, शैक्षणिक तत्त्वज्ञान, ज्ञानाची प्रक्रिया, पौर्वात्य-पाश्चात्त्य शिक्षण असे काही वैचारिक मंथन केल्याचे आठवत नाही. त्यांनाही आपण देशाचे शिक्षणमंत्री होऊ याची कल्पना नव्हती. पण देशाचा प्रधानमंत्री जरी कोणी झाला, तरी तो प्रथम स्वयंसेवक असतो आणि संघाची शिकवण प्रकटत राहतो, हे आपण रोज ऐकतो, वाचतोच.

Subscribe Now !

Get instant access to the complete Watsaru archives

New 3-Month Subscription to Digital Archives at just Rs 350 for India and $15 for overseas users.

Subscribe