97632 06212 pwatsaru@yahoo.com

‘डोनाल्ड ट्रम्प’ यांची जिवाची मुंबई


‘फोर्ब्स इंडिया’ या मासिकाच्या सप्टेंबर 2014 च्या अंकात प्रसिद्ध झालेल्या मुलाखतीत डोनाल्ड ट्रम्प यांनी खास त्यांनाच साजेल असं असभ्य विधान केलं होतं : तुमच्याकडचं स्थावर मालमत्तेचं क्षेत्र अविश्वसनीयरीत्या स्वस्त आहे... मुंबई हे महान शहर आहे आणि तरीही तिच्या तुलनेतील इतर शहरांसारखी या शहराची किंमत लावलेली दिसत नाही. उलट दुय्यम महत्त्वाच्या शहरांपेक्षाही मुंबईची किंमत कमी ठेवलेली आहे. याचा अर्थ, गुंतवणूकदारांना इथं प्रगतीसाठी प्रचंड वाव आहे. (श्रीवास्तव 2014.) अमेरिकी राष्ट्राध्यक्षपदासाठीच्या मोहिमेमध्ये ज्या स्तराची त्यांनी शेरेबाजी केली, तेवढा मुंबईविषयीचा त्यांचा शेरा वादग्रस्त नव्हता. पण ट्रम्प यांची ही अतिशयोक्ती भारतात मोठी बातमी बनली. वास्तविक भारतामध्ये मुंबईतील घरबांधणी बाजारपेठ देशात सर्वांत महागडी आहे. भारताच्या राष्ट्रीय अर्थव्यवस्थेचं उदारीकरण 1990 च्या दशकामध्ये झालं, तेव्हा मुंबईतील महागड्या स्थावर मालमत्ता क्षेत्राविषयीच्या बातम्या नियमितपणे वर्तमानपत्रांच्या पहिल्या पानांवर प्रसिद्ध होत असत. अनेकदा मुंबईची तुलना भारतातील दिल्ली, चेन्नई किंवा बंगलोर अशा समकक्ष शहरांऐवजी अधिक संपन्न लंडन किंवा न्यूयॉर्क अशा जागतिक शहरांशी होते.

Subscribe Now !

Get instant access to the complete Watsaru archives

New 3-Month Subscription to Digital Archives at just Rs 350 for India and $15 for overseas users.

Subscribe