97632 06212 pwatsaru@yahoo.com

कचर्यात काम करताना


अभिनया रमेश यांच्या ‘दलित स्त्री आणि स्त्रीवादी जाणिवा’ (वाटसरू, 1 ते 15 जून 2016) या लेखावर छाया दातार यांचा प्रतिसाद (1 ते 15 जुलै 2016) व या प्रतिसादावर लता प्रतिभा मधुकर यांची प्रतिक्रिया (1 ते 15 ऑगस्ट 2016) वाचली. अभिनया रमेश यांच्या समीक्षात्मक विद्यापीठीय मांडणीच्या लेखासोबत संपादकांनी माझा माझ्या वैयक्तिक अनुभवावरील लेख (कचर्यात काम करताना) छापला, हा माझ्या दृष्टीनं योगायोग होता. पण मग ते जात, धर्म, वर्ण, गरीब, श्रीमंत, श्रेय लाटणारे वगैरे काहीतरी गंभीर प्रकरण आहे हे लता प्र. म. यांचा लेख वाचून समजले.