97632 06212 pwatsaru@yahoo.com

शेष अनेक : निसर्गप्रेरणांचा उत्सव


कवी मोहन राणा यांची ‘शेष अनेक’ संग्रहातील काही समजलेली कविता मी वाचली. हिंदी कवितेतील प्रवाहाची पुरेशी समज मला नाही.परंतु समकालीन हिंदी कवितेची ओळख सामाजिक घटितांतून ठळकपणे पुढे येते. ही बाब नाकारता येत नाही. सामाजिक प्रारूपाची चिकित्सा हा तिचा अहम आणि अंतःस्वर बनला आहे. मानवी प्रवृत्तीचे दर्शन सामाजिक परिवेशातून पुढे येते. राजकीय पृष्ठभूमीशी तिचं नातं अत्यंत जवळचं आहे. म्हणजे समकालीन वास्तवशी तिचे नाते आहे.