97632 06212 pwatsaru@yahoo.com

निमित्त : पाऊस


पावसाची ‘एक लाचखाऊ ऋतू’ वा ‘लहरी व लाच खाणारा’ अशी एक प्रतिमा लहानपणातच मनात निर्माण केली गेली आहे. हिंदू-ब्राह्मणी देवदेवता ज्याप्रमाणे काही ना काही लाच घेतल्याशिवाय प्रसन्न होत नाही, तसेच पावसाचेही झाले आहे. ‘येरे येरे पावसा, तुला देतो पैसा’ या काव्यपंक्ती कुणी रचल्या, हे अज्ञात असले; तरी रचणारी काव्यबुद्धी नक्कीच हिंदू-ब्राह्मणी आहे, यात शंका नाही. पाऊसही पैसा घेतल्याशिवाय किंबहुना लाच घेतल्याशिवाय बरसत नाही, हा या काव्यपंक्तीचा आशय आपल्या विषमता आणि अनैतिकता संपोषक सामाजिक धारणांचा सरळ निर्देश करतो. धार्मिकदृष्ट्या पावसाकडे पाहण्याच्या दृष्टिद्वंद्वाचा विचार काही भारतीय प्राच्यविद्यातज्ज्ञ श्रमण आणि ब्राह्मण किंवा अब्राह्मणी आणि ब्राह्मणी या परस्परविरोधी तत्त्वज्ञान, परंपरा द्विविधतेत करतात.

Subscribe Now !

Get instant access to the complete Watsaru archives

New 3-Month Subscription to Digital Archives at just Rs 350 for India and $15 for overseas users.

Subscribe