97632 06212 pwatsaru@yahoo.com

‘बलुतं’ व ‘जूठन’ : मानखंडनेच्या कहाण्या


पूर्वास्पृश्यांच्या जीवनातील मानसिक आघात, क्लेश आणि व्यथा यांची अभिव्यक्ती करण्यासाठी दलित वैयक्तिक कथनांचं माध्यम अतिशय प्रत्ययकारी ठरलं आहे. दलितांचं दमन करणार्या व त्यांना परिघावर ढकलून देणार्या श्रेणीबद्ध सामाजिक-सांस्कृतिक अवकाशाचं अधोविश्व उघड करण्याच्या प्रयत्नप्रक्रियेत आत्मकथनांना महत्त्व प्राप्त झालं. प्रादेशिक बोलींमध्ये लिहिलेल्या दलित आत्मकथनांची भाषांतरं-विशेषतः इंग्रजीत झालेली भाषांतरं-अलीकडच्या काही वर्षांमध्ये प्रकाशित झाल्यावर काही प्रमाणात त्याचे पडसाद उमटलेले दिसतात. कोणताही आडपडदा न ठेवता दलित जीवनातील उलथापालथींची अभिव्यक्ती झाली आणि आता उसन्या बोली’तून निराळ्या सामाजिक-सांस्कृतिक अवकाशांमध्ये या अभिव्यक्तीचा प्रवास सुरू झाला असताना हे पडसाद अधिकाधिक निनादत राहतील.

Subscribe Now !

Get instant access to the complete Watsaru archives

New 3-Month Subscription to Digital Archives at just Rs 350 for India and $15 for overseas users.

Subscribe