97632 06212 pwatsaru@yahoo.com

ग्रेस यांची कविता : प्रश्न अनेक


ग्रेस (माणिक सीताराम गोडघाटे, मे 1937-मार्च 2012) यांच्या कवितेबद्दल दोन टोकाची मते आहेत. एक तर ही कविता जात्याच संदिग्ध आणि गूढ आहे, त्यामुळे कवितेचा एक मोठा वर्ग ह्या कवितांकडे दुर्बोधतेमुळे फारसा वळला नाही. ग्रेस यांचा दुसरा एक विशेष असा वर्ग आहे (ज्यासाठीच कदाचित गेल्या तीन दशकांपेक्षा अधिक काळ ह्या कविता ग्रेस लिहीत राहिले असावेत); ग्रेस यांच्या कवितेचे गारुड या वर्गाने कधीच धूसर होऊ दिले नाही. ते सतत त्यामध्येच राहिले. आजही ते तसेच आहेत. अर्थात असे असणे यात काही गैर आहे असे नाही शिवाय त्यांनी त्यांचा दृष्टिकोन बदलावा असेहीे काही इथे सुचवायचे नाही. मीही या गारुडाचा दीर्घकाळ एक वाहकच होतो व त्याचा प्रभाव तसा लगेच सरतही नसतो.