97632 06212 pwatsaru@yahoo.com

प्र. जा. तंत्राचा गुरुमंत्र


विष्णू दिगंबर पलुस्कर यांना भारतीय शास्त्रीय संगीताचे शिक्षण खुले करण्याचे श्रेय मिळालेले आहे. मुळात शास्त्रीय संगीत अत्यंत जखडबंद, जातबंद आणि जिकिरीचे. तवायफकडे जाऊन शिकण्याचे धाडस नाही की श्रीमंतांप्रमाणे घरी कोणाला बोलावून शिकण्याची ऐपत नाही. गुरूला कोण आवडेल, कोण नाही सांगता यायचे नाही. त्यामुळे अनेकजण गाणे शिकू शकत नसत. पलुस्करांनी चक्क महाविद्यालय, तास, परीक्षा, वर्ग सुरू करून शास्त्रीय संगीत खुले केले. त्याबद्दल त्यांची खूप हेटाळणी झाली. ती करणारे संगीत जुन्या गुरुशिष्य परंपरेतूनच शिकवले जावे या मताचे होते. पण आज संगीत गुरुशिष्य नात्यातून मोकळे तर झालेच शिवाय सवर्णांच्या तावडीतून बाहेर पडले. पदवी, संशोधन, प्रशिक्षण, प्रसार यांद्वारे शास्त्रीय संगीत रुळू-कळू लागले असून अनेकांना रोजगार, प्रतिष्ठा व आनंद देते आहे. म्हणून पलुस्कर ब्राह्मण असूनही एका कडेकोट ‘शास्त्री’य परंपरेस धक्का देणारे शिक्षक ठरले. हा ब्रिटिश सत्तेचा परिणाम!

Subscribe Now !

Get instant access to the complete Watsaru archives

New 3-Month Subscription to Digital Archives at just Rs 350 for India and $15 for overseas users.

Subscribe