97632 06212 pwatsaru@yahoo.com

धारवाडचा शांतिमार्च


लेन नं. 9, कल्याणनगर, धारवाड. 30 ऑगस्ट 2016. सकाळी नऊचा सुमार. डॉ. एम. एम. कलबुर्गींच्या घराजवळ कर्नाटकातील तसेच देशातील इतर प्रांतांतून आलेल्या कार्यकर्त्यांची लगबग. डॉ. कलबुर्गींच्या क्रूर हत्येला एक वर्ष पूर्ण झालं. पोलीस आपलं तपासकाम विसरून गेलेली. वृत्तपत्रातल्या बातम्याही मंदावल्या. ‘पब्लिक मेमरी इज शॉर्ट’ असं म्हटलं असलं, तरी ते पूर्ण सत्य नव्हे. काही ओरखड्यांनी थेट काळजाला इजा पोहोचलेली असते. प्रत्येक सुजाण माणसाला त्याची अधूनमधून जाणीव होत असते. चीडही येते. पण एकटा, एकटा काय करणार? याआधी दाभोलकर, पानसरे यांच्या हत्या झाल्या. त्यांच्याही मारेकर्यांचा शोध नाहीच लागलेला. तिघांतील समान धागा म्हणजे हे तिघेही विचारवंत आणि प्रखर विवेकवादी. ‘अशांच्या खुन्यांचा शोध लागत नसतो’ असं तर सरकारी यंत्रणेला सूचित करायचं नाही ना, अशी आता शंका बळावत आहे.