97632 06212 pwatsaru@yahoo.com

धर्मसत्तेचे राज्यसत्तेवरील वर्चस्व


त्या घटनेला माध्यमांनी विशेष महत्त्व दिले नाही. पण ती तशी साधी घटना नव्हती. भारतीय लोकशाहीत ती तशी घटना प्रथमच घडली. 26 ऑगस्ट 2015 रोजी हरियाणा विधानसभेच्या पावसाळी अधिवेशानाच्या आरंभाला जैन मुनी तरुण सागर यांना आमदारांना संबोधित करण्यासाठी पाचारण केले होते. ते दिगंबरपंथी असल्याने ते दिगंबर अवस्थेत होते. त्यांचे आसन सभापती व राज्यपाल यांच्या आसनापेक्षा उच्चस्थानी ठेवण्यात आले होते. संसदेत राष्ट्रपती अभिभाषणाला येतात, तेव्हा तेथे राष्ट्रपतीचे आसन मध्यभागी असते. राष्ट्रपतीच्या आसनाच्या उजव्या बाजूला राज्यसभेचे अध्यक्ष व डाव्या बाजूला लोकसभेचे सभापती आसनस्थ असतात. राष्ट्रपती हा संपूर्ण राष्ट्राचा प्रमुख असतो. राज्यपाल हा राज्याचा प्रमुख असतो. त्यामुळे विधानसभेत राज्याच्या प्रमुखाच्या वर कोणाचेही आसन असू शकत नाही व असता कामा नये. परंतु हरियाणा विधानसभेत राज्याच्या प्रमुखापेक्षा उच्चस्थानी धर्मप्रमुखाला स्थान देण्यात आले होते. हा केवळ अपघाताने घडलेला संकेतभंग नव्हता. राज्यपालाच्या वर धर्मगुरूंचे आसन मांडणे हे जाणीवपूर्वक केलेले कृत्य होते.

Subscribe Now !

Get instant access to the complete Watsaru archives

New 3-Month Subscription to Digital Archives at just Rs 350 for India and $15 for overseas users.

Subscribe