97632 06212 pwatsaru@yahoo.com

- घर हवंय फातिमाला


धार्मिक आणि वांशिक घेट्टोच्या बाहेर घर हवेय... फातिमाला... गुजरातेत ! एक लहानशा आणि दडवून ठेवलेल्या स्वप्नाला आकार आणि रूप देण्याची ती वेळ होती. ते सत्यात उतरवण्याचा विचार करणे हेदेखील एक धाडसच होते. जे धाडस कुणीही करू शकत नाही, ते तिने केले होते आणि अजूनही तिला धाडस करण्यासारखे खूप काही होते. अखेरीस ती फातिमा लोखंडवाला होती. एक धाडसी तरुण स्त्री. तिच्या अत्यंत कठीण अन खाचखळग्याच्या जीवनप्रवासात ही गोष्ट खूप मोठी होती. तिला विचार करायला वेळ होताच कुठे! पण कदाचित हीच ती वेळ होती : एका विलक्षण रम्यकल्पनेत गुंगून जाण्याची.