97632 06212 pwatsaru@yahoo.com

2001 च्या भूकंपाने कायमचा हादरलेला गुजरात


भूकंप झाला त्या दिवशी सकाळी गुजरातचे तत्कालीन उद्योग मंत्री सुरेश मेहता भूजमध्ये होते. काय होतंय याची कल्पना आल्यावर ते लगेचच दाराची चौकट पकडून उभे राहिले. भूकंपाच्या वेळी काय करावं, याची लहानपणी मिळाली शिकवण लक्षात ठेवून ते तसे वागले. त्या दिवशी ध्वजवंदनेच्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचं अधिकृत कर्तव्य त्यांना पार पाडायचं होतं, त्यामुळं भूकंपाचे धक्के ओसरल्यावर ते गाडीतनं बाहेर पडले, तर कोसळलेल्या घरांनी त्यांचा रस्ता अडवला नि मग ते पायी कार्यक्रमाच्या ठिकाणी पोचले. हवेत सगळीकडे धूळ भरून राहिली होती, शहर उद्ध्वस्त झालं होतं, कोसळलेल्या इमारतींनी रस्ते अडवून ठेवले होते - याची आठवण मेहतांनी नंतर सांगितली. त्यांचं नशीब चांगलं होतं. या भूकंपात भूजमधील दोन हजारहून अधिक लोक, म्हणजे शहराच्या एकूण लोकसंख्येपैकी सुमारे 1.7 टक्के लोक मृत्युमुखी पडले.

Subscribe Now !

Get instant access to the complete Watsaru archives

New 3-Month Subscription to Digital Archives at just Rs 350 for India and $15 for overseas users.

Subscribe