97632 06212 pwatsaru@yahoo.com

गुजराती चित्रपट ः संत, सती आणि शेठाणींच्या गोष्टी


1982 : गुजराती सिनेमा त्याचे सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरे करत होता. मुंबईमधील गुजराती सिनेमामधील नामवंत मंडळी आणि स्क्रीन युनिट या स्वतंत्र फिल्म क्लबने एकत्रितपणे विविध गाजलेल्या गुजराती सिनेमांचा महोत्सव आयोजित केला होता. मला माझ्या कारकिर्दीमध्ये या स्क्रीन युनिटचे अध्यक्षपद भूषवण्याचा मान मिळाला होता. या सुवर्णमहोत्सवी वर्षाच्या निमित्ताने आम्ही म्हणजे मणिलाल गाला आणि मी संपादित केलेल्या ‘गुजराती चलचित्र : 1982 ना आरे’ या पुस्तकाचे प्रकाशन केले. या पुस्तकाच्या माध्यमातून पहिल्यांदाच 1932 ते 1982 मध्ये प्रकाशित झालेल्या सर्व गुजराती चित्रपटांचा आढावा घेण्यात आला होता. याखेरीज, या पुस्तकामध्ये इतर भारतीय भाषांमध्ये तयार झालेले मात्र, गुजराती भाषेमध्ये डब करण्यात आलेल्या सर्व सिनेमांबद्दल, 1920 ते 1931 या काळात सक्रिय राहिलेल्या सर्व गुजराती दिग्दर्शकांबद्दल आणि गुजराती चित्रपटनिर्मिती गटांबद्दलही विस्तृत माहिती देण्यात आली आहे. या पुस्तकामध्ये प्रसिद्ध मूकपट सिनेतज्ज्ञ वीरचंद धरमसी आणि मी लिहिलेला एक संशोधनात्मक लेखाचादेखील समावेश करण्यात आला आहे. या लेखामध्ये, एक महत्त्वाची मांडणी करण्यात आली आहे. भारतातील मूकपटात दाखवण्यात आलेल्या पटकथेमध्ये अनेकदा गुजराती संस्कृती आणि गुजरातीपणाचे महत्त्वाचे अंश आणि संदर्भ आढळून येतात. सुरुवातीच्या भागात, आपण भारतीय मूकपटांचा काळ आणि त्यामध्ये आढळून येणार्या गुजरातीपणाबाबत चर्चा करूया.1

Subscribe Now !

Get instant access to the complete Watsaru archives

New 3-Month Subscription to Digital Archives at just Rs 350 for India and $15 for overseas users.

Subscribe