97632 06212 pwatsaru@yahoo.com

परत जुने दिवस?


दलित मजूर राजू आगेनं गेल्या दोन वर्षांच्या काळात न्यायालयांच्या अनेक फेर्या केल्या आहेत. 2014 साली त्याचा सतरा वर्षांचा मुलगा नितीनची हत्या करण्यात येऊन त्याचं प्रेत झाडावर लटकवण्यात आलं होतं. त्याचा गुन्हा असा होता की, तो मराठा जातीच्या एका मुलीशी बोलला. त्याला ठार मारणार्यांमध्ये तिचा एक भाऊ होता. आज आगे कुटुंब हे एकाकी जीवन जगत आहे. अॅस्बेस्टॉस पत्र्यांच्या चार भिंती आणि छप्पर असलेलं त्यांचं घर महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील, जामखेड तालुक्यातील खर्डा नावाच्या खेडेगावाच्या शिवारात कसंबसं उभं आहे. आता हा जिल्हा परत एकदा धक्कादायक गुन्ह्याच्या छायेखाली वावरत आहे. कोपर्डी खेड्यातील एका मराठा जातीच्या मुलीवर सामूहिक बलात्कार आणि हत्येच्या प्रकरणाने मराठा जातीच्या समाजगटांनं राज्यपातळीवर आंदोलन सुरू केलं आहे. तीन दलित तरुणांना ह्या संदर्भात अटक करण्यात आली आहे.

Subscribe Now !

Get instant access to the complete Watsaru archives

New 3-Month Subscription to Digital Archives at just Rs 350 for India and $15 for overseas users.

Subscribe