97632 06212 pwatsaru@yahoo.com

मूकमोर्चाची महायंत्रणा


कोल्हापूर शहराच्या मध्यवर्ती भागातील एक सभागृह. लोक आत-बाहेर जा-ये करत आहेत. एकमेकांशी चर्चासंवाद करत आहेत. आणि या सर्व गडबडीला बाजूला सारून एक आवाज सभागृहात गुंजतो आहे. तो आवाज आहे एका तरुणीचा. प्राजक्ता संकपाळ तिचे नाव. ती म्हणतेय, या देशात एकच असे शाहू महाराज होऊन गेले ज्यांनी देशाला आरक्षणाची संकल्पना दिली आणि त्यावेळेस सर्व मराठ्यांना आरक्षण दिलं. पण देशाला स्वातंत्र्य मिळालं आणि मराठा त्या यादीतून बाजूला काढले गेले. आपल्यावर हा अन्याय का झाला हे विचारण्याची वेळ आज आलेली आहे. प्राजक्ता बोलत होती. तिच्यासमोर अनेक मध्यमवयीन आणि ज्येष्ठ मराठा पुरुष बसलेले होते.

Subscribe Now !

Get instant access to the complete Watsaru archives

New 3-Month Subscription to Digital Archives at just Rs 350 for India and $15 for overseas users.

Subscribe