97632 06212 pwatsaru@yahoo.com

स्त्रीपुरुषतुलना ः काही अंश


ज्या परमेश्वराने ही आश्चर्यकारक सृष्टि उत्पन्न केली, त्यानेंच स्त्रीपुरुष निर्माण केले. तरी सर्व प्रकारचे साहास दुर्गुण स्त्रियांचेच अंगी वसतात किंवा जे अवगुण स्त्रियांचे अंगी आहेत तेच पुरुषांत आहेत किंवा नाहींत हे अगदीं स्पष्ट करून दाखवावें याच हेतूनें हा लहानसा निबंध मी माझ्या सर्व देशभगिनींचा अभिमान धरून रचिला आहें. यांत अमुकच जाती किंवा कुळ याकडे माझें मुळीच लक्ष नाहीं. स्त्रीपुरुषाची तुलना आहे. तसेंच पुनर्विवाह ब्राह्मणांतच होत नाहीं असें कांहीं नाहीं. दुसर्या अवांतर पुष्कळ परभू, शेणवी, गुजराथी, भाटे, मारवाडी, मर्हाठे, देसाई, देशमुख, इनामदार, जहागिरदार, शिरके, महाडीक, जाधव, भोंसले, माने असे अनेक आडनांवाचे सोलापूर, सातारा, पुणेें, ग्वाल्हेर, इंदूर, या प्रांतीं असे जे मराठे मर्हाठशाईला मरतात त्या त्यांचे कुळांत तर ब्राह्मणापेक्षांहि पुनर्विवाह न होण्याची सक्ती दिसून येते. या लोकांचे घराण्यांत तर प्राणांतीं असें होणार नाहीं. अशा उठून गेल्या तर जाऊं देतील, पण पुनः दुसरा नवरा कधींच करूं देणार नाहींत.

Subscribe Now !

Get instant access to the complete Watsaru archives

New 3-Month Subscription to Digital Archives at just Rs 350 for India and $15 for overseas users.

Subscribe