97632 06212 pwatsaru@yahoo.com

मराठ्यांची पूर्वपीठिका अथवा रट्टवंशोत्पत्तीविषयी शास्त्रीय विचार


हा प्रयत्न निर्णायक मुळीच नाही. केवळ दिग्दर्शक आहे. असल्या प्राचीन विषयाचा निर्णय लावू पाहणे केव्हा केव्हा हास्यास्पद होते. हे जाणून ह्याची जवळ जवळ दिशा जरी दाखविता आली, तरी मी स्वत:स कृतार्थ समजेन. शिवाय माझा दुसरा एक हेतु आहे. तो तरुण विद्यार्थ्यांना अनुलक्षून आहे. ह्याच विषयाचा विचार मागे एकदा मी भारतीय इतिहास संशोधक मंडळापुढे केला होता. त्या वेळी माझा हेतु आर्य आणि अनार्य ह्या शब्दांचा प्रचार आणि तज्जन्य कांही दृढमूल झालेल्या तीव्र भावना विद्वान् म्हणविणार्यांमध्येही असलेल्या पाहून, त्या कशा अनैतिहासिक आहेत हे दाखविण्याचा होता. कॉलेजात उच्च शिक्षण घेणार्या तरुणांना अशा भरमसाट भावनांचा वेळीच इषारा मिळून, त्यांना विशाल विचारांची सवय लागेल, ह्या आशेने मी त्यांचेपुढे हा विषय ठेवीत आहे.

Subscribe Now !

Get instant access to the complete Watsaru archives

New 3-Month Subscription to Digital Archives at just Rs 350 for India and $15 for overseas users.

Subscribe