97632 06212 pwatsaru@yahoo.com

परखड लेखन


1 ते 15 ऑक्टो. 2016 चा अंक मिळाला. अंकातील संपूर्ण मजकूर नेहमीप्रमाणेच विचारप्रवर्तक आहे. अभिनंदन आणि धन्यवाद! सुधाकर गायकवाड यांच्या दीर्घ लेखातील परखड, सत्यान्वेषी तथा संविधानसंमत विचार आजच्या परिप्रेक्षातच नव्हे तर भविष्यवेधीही आहेत. गायकवाड यांच्या लेखावर काही अन्यथा लिहिणे म्हणजे ‘लहान तोंडी मोठा घास’ ठरणार असला तरी, इतके सुंदर विचार मांडणारा लेख पुनरुक्तीमुळे पसरट झालाय असे मला वाटले. हा लेख गोळीबंद स्वरूपात असायला हवा होता, असेही वाटले. असो. ही माझी टीका नव्हे, माझे वैयक्तिक मत म्हणूनच विचारात घ्यावे ही विनंती.